By  
on  

पाहा Video : बादशाहच्या जुगनूवर थिरकली छोटी परी

माझी तुझी रेशीमगाठ ह्या मालिकेत प्रसिध्द अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रसिध्द अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही जोडी प्रमुख भूमिकेत असली तरी प्रेक्षकांचं लक्ष वेधतेय ते छोटी परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ. तिचा मालिकेतला वावर प्रेक्षकांना सुखावून टाकणारा आहे. तिचे लाडिक संवांद प्रेमात पाडतात. ही गोड मायरा ऑनस्क्रीनप्रमाणेच ऑफस्क्रीनसुध्दा बरीच धम्माल करताना पाहायला मिळते. 

सध्या इन्स्टाग्राम रील्सचा जमाना आहे. ट्रेडींग रील्सवर व्हिडीओ अपलोड केला नाही तर नेटक-यांना अगदी कसंनुसं होतं. मायराचंसुध्दा असंच आहे. सोशल मिडीयावर तिचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या प्रत्येक व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते. नुकतंच मायरा म्हणजेच छोटी परी बादशाहच्या जुगनू गाण्यावर तिच्या स्टाईलने थिरकली. तिच्या या गोड व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive