By  
on  

नादचखुळा ! परी आणि शिव ठाकरेचा हा व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

सोशल मिडीयामुळे आजकाल कलाकारांची पडद्यामागची धम्माल पाहणं म्हणजे चाहत्यांसाठी नित्याचंच झालं आहे. सोशल मिडीयावर सतत काही ना काही व्हायरल होत असतं. नुकताच एक गोड व्हिडीओ व्हायरल होतोय. माझी तुझी रेशीमगाठची छोटी परी म्हणजेच मायरा वायकुळ आणि बिग बॉस मराठी सीझन २ चा विजेता शिव ठाकरे यांचा हा अफलातून व्हिडीओ आहे. 

सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीसुध्दा तिचे चाहते आहेत. ग बॉस २ पर्वाचा विजेता शिव ठाकरे हा देखील परीचा फार मोठा चाहता आहे. नुकतंच एका कार्यक्रमात परी आणि शिवची भेट झाली. यावेळीचा एक व्हिडीओ मायराच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओत मायरा आणि बिग बॉस विजेता शिव ठाकरे दोघेही पाहायला मिळत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lokmat (@milokmat)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive