By  
on  

पती समीर वानखेडेंच्या वाढदिवशी क्रांतीची खास पोस्ट, तुम्ही जरुर वाचा

प्रसिध्द  अभिनेत्री क्रांती रेडकर ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. क्रांती ही एक अभिनेत्रीच नाही तर  एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची पत्नीसुध्दा आहे. सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यामुळे क्रांतीचे पती व एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे प्रचंड चर्चेत होते. आज त्यांच्या वाढदिवस आहे. पतीच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीने सोशल मिडीयावर त्यांच्यासाठी एक खास पोस्ट शेयर केली आहे. 

 

क्रांतीने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये क्रांतीने समीर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत समीर वानखेडेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी नेहमी तुमच्याबद्दल आणि तुमच्या शौर्याविषयी खूप काही लिहिते, परंतु आज शब्द कमी पडत आहेत. देशातील अमली पदार्थांशी निगडीत दुष्टांशी लढा देणं ही एक गोष्ट तर आहे, परंतु तुमच्या या मोहिमेत तुम्हाला रोखणाऱ्या सर्वांविरुद्ध लढा देणं हा एक मोठा संघर्ष आहे. या संघर्षाचा तुम्ही दररोज सामना करत आहात आणि त्यावर दररोज तुम्ही मात करत आहात. तुम्ही खूप चांगलं काम करत आहात, समाजातील घाण काढू टाकत आहात. त्यासोबत तरुणांना योग्य मार्ग दाखवत आहात, त्यांच्या भल्यासाठी काम करत आहात (आता कदाचित त्यांना ही बाब समजणार नाही), असे क्रांती म्हणाली.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive