By  
on  

'अंधाधून' फेम या अभिनेत्रीला करायचंय मराठी सिनेमात काम

आयुष्यमान खुरानाच्या 'अंधाधुन' या गाजलेल्या बॉलिवूडपटात झळकलेली अभिनेत्री रश्मी आगडेकर तिच्या अभिनय कोशल्यालाठी ओळखली जाते. ती सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. इंटर्न २ या वेबसिरीजमध्येसुध्दा ती महत्त्वूर्ण भूमिकेत झळकली होती. मूळची महाराष्ट्रीयन असलेल्या रश्मीने अद्याप मराठी सिनेविश्वात काम केलेलं नाही, त्यामुळे मराठीत काम करण्याची इच्छा तिने नुकतीच व्यक्त केली आहे. 

रश्मी आगडेकरला आता मातृभाषेत काम करण्याची ओढ लागली आहे. जगभरात नावाजलेल्या मराठी सिनेमाचा भाग होण्यासाटी ती बरीच उत्सुक असल्याचं तिने सांगितलं आहे. 

वर्कफ्रंटबद्दल बोलताना, रश्मी आगडेकरने 2017 मध्ये  "देव डीडी" या वेबसिरीजमधून मधून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आणि 2018 मध्ये समीक्षकांनी प्रशंसित एमएक्स प्लेयर चित्रपट "आय एम मॅच्युअर" मध्ये मुख्य भूमिका साकारली. तिने आयुष्मान खुरानासोबत काम केलेल्या "अंधाधुन" या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि नुकतीच इंटर्न २ मध्ये दिसली होती.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive