By  
on  

तेजश्री प्रधानचं छोटया पडद्यावर कमबॅक, जाणून घ्या

मालिकाविश्वात एखाद्या अभिनेत्रीनं नाव कमावलं की मग ती खुुप प्रसिध्द होते. घराघरांत या नायिकेवर प्रेमाचा वर्षाव केला जातो. अशीच छोट्या पडदयावरची आदर्श सूनबाई म्हणून प्रसिध्द असलेली अभिनेेत्री तेजश्री प्रधान ही ब-याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय. 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेच्या सुरुवातीपासूनच येणारी रंजक वळणं प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यास यशस्वी ठरत आहेत. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आहे.

या मालिकेत लवकरच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची एंट्री होणार आहे. शिर्डीमधल्या आनंद जत्रेत अष्टपैलू व्यक्तिमत्त्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, असं मालिकेत दाखवण्यात येणार आहे. या स्पर्धेत कीर्ती सहभागी होणार असून या स्पर्धेच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत तेजश्री प्रधान दिसेल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive