छोट्या पडद्यावरचे पती-पत्नी ख-या अयुष्यातही झाले नवरा-बायको

By  
on  

सध्या सर्वत्र लग्नसराईचा हंगाम सुरुय त्यातच कलाविश्वातील अनेक जोडपी लग्नबंधनात अडकतायत. बॉलिवूड आणि टी.व्ही जगतातले अनेक सेलिब्रिटी यांचा विवाहसोहळा संपन्न होत आहे. आता या यादीत मराठी टीव्ही जगतातली एक जोडीसुध्दा समाविष्ट होत आहे. लग्नाची बायको आणि वेडींगची वाईफ या झी मराठीवरील मालिकेतील नायक-नायिका विजय आंदळकर व रुपाली झनकर हे नुकतेच विवाहबध्द झाले आहेत. सोशल मिडीयावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by rupalizankar (@rupalizankar)

 

विजय आंदळकर आणि रुपाली झनकर या सेलिब्रिटी कपलच्या लग्न व हळदीच्या फोटोंवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

 

रुपाली झनकार ही मूळची नाशिकचीच आहे इथेच तिचे शालेय तसेच पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू ही तिने साकारलेली पहिली टीव्ही मालिका होती. तर विजय आंदळकरने स्वराज्यरक्षक संभाजी, वर्तुळ, गोठ, प्रेमा तुझा रंग कसा या मालिका अभिनित केल्या आहेत. मि अँड मिसेस सदाचारी, 702 दीक्षित हे चित्रपट साकारले आहेत त्यामुळे विजयने मराठी चित्रपट सृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

Recommended

Loading...
Share