By  
on  

अहोंं सोबत दिसला अप्सरेचा खट्याळ अंदाज, या शोमध्ये लावली एकत्र हजेरी

महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी सध्या यशोशिखरावर आहेत. लॉकडाऊननंतर सिनेमागृह सुरु झाल्यावर सोनालीचे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. पांडू आणि झिम्मा. या ति्च्या दोन्ही सिनेमांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम करत ते तुफान हाऊसफुल्ल केले. यावरुनच सोनालीवर रसिकांचं किती प्रेम आहे हे सिध्द झालं. नुकतंच सोनाली पती कुणाल बेनोडेकर यांच्यासोबत किचन कल्लाकार या झी मराठीवरील शोमध्ये हजेरी लावली होती.

सोनालीसाठी हे वर्ष खुपच खास आहे. ती यंदाच लग्नबंधनात अडकलीय. येत्या मे महिन्यात तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. 

 

सोनाली आणि कुणाल यांची जबरदस्त केमिस्ट्री नेहमीच पाहायला मिळते. 

सोनाली कुलकर्णी आणि पती कुणालच्या फोटोंवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive