By  
on  

करिना-सैफसारखंच या प्रसिध्द मराठी अभिनेत्याच्या मुलाचं नावं आहे जहांगीर

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि त्याची बेगम करिना कपूर खान हे नेहमीच चर्चेत असतात. पण त्यांची दोन लहान मुलंसुध्दा लाईमलाईटपासून दूर नाहीत. जेव्हा करिनाच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या तैमूर या नावावरुन बराच वादंग निर्माण झाला होता. ब-याच वेळा सैफ-करिनाला हे नाव ठेवल्याने ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर अलिकडेच करिना आणि सैफ या दाम्पत्याला दुसरा मुलगा झाला. त्यांनी त्याचं नाव जहांगीर असं ठेवलं. त्यावरुनही या दोघांना प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं.

पण या सर्व चर्चांमध्ये तुम्हाला एक गोष्ट माहितीय का... एका मराठी अभिनेत्याने त्याच्या मुलाचं नाव जहांगीर असं ठेवलंय.... वाचून आश्चर्य वाटलं ना...पण हे खरं आहे. विशेष म्हणजे तो अभिनेता शिवरायांची ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी खास ओळखला जातो. मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर याच्या मुलाचं नावही जहांगिर आहे, त्यामुळे पुन्हा या नावाची चर्चा सुरू आहे

.चिन्मयनं 'फत्तेशिकस्त' या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट शिवरायांच्या गनिमी कावा या मोहिमेवर आधारित होता.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive