By  
on  

अरुंधती फेम मधुराणी म्हणते, 'तेव्हा आपण आपल्याला खरे सापडायला लागतो.....'

आई कुठे काय करते फेम अरुंधती म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री मधुराणी गोखले सोशल मिडीयावर आजकाल बरीच सक्रीय असते. नुकतंच मधुराणीने आई कुठे काय करते ह्या तिच्या लोकप्रिय मालिकेतील एका महत्त्वपूर्ण सीनचा जुना व्हिडीओ शेयर करत एक प्रेणादायी पोस्ट करत मालिकेच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. 

मधुराणी व्हिडीओ शेयर करत म्हणते, आपण आपल्या आयुष्यात कधीही न केलेली गोष्ट करून पाहतो ....आपल्या सोयीच्या परिघा बाहेर पडून काहीतरी नवीन शिकतो तेव्हा आपण आपल्याला खरे सापडायला लागतो.
जशी ह्या छोट्या छोट्या पावलातून अरुंधतीला तिचं स्वत्व सापडत गेलं .
इंस्टा वरच्या एका फॅनपेजनी आज हे share केलं आणि पुन्हा एकदा मला भरून आलं. आतून आतून कृतज्ञ वाटलं त्या प्रत्येकाविषयी ज्यांच्यामुळे मी ही भूमिका करू शकले...आणि करू शकतेय
आज वेगवेगळ्या स्तरातल्या मला अनेक स्त्रिया भेटतात. गृहिणी असतात , शिक्षिका असतात, ऑफिसर असतात , उद्योजिका असतात....वेगवेगळ्या वयाच्या , वेगवेगळ्या आर्थिक , सामाजिक स्तरातल्या.... पण त्यांच्या प्रत्येकीच्या डोळ्यात मला भेटून हलकं पाणी असतं.... प्रत्येकिला अरुंधती मध्ये ती सापडली असते....कुठल्या न कुठल्या टप्प्यावर तिनी अरुंधती कडून प्रेरणा घेतलेली असते... अरुंधतीनी तिला धीर दिलेला असतो , सावरलेलं, एक आशेचा किरण दाखवलेला असतो .. अगदी मी स्वतः सुद्धा ह्याला अपवाद नाहीये हं..!
आमची अतिशय गुणी आणि हुशार लेखिका नमिता वर्तक , संवाद लेखिका मुग्धा गोडबोले आणि संवेदनशील दिग्दर्शक रवींद्र करमरकर सर , मी तर आहेच पण अशा असंख्य स्त्रिया तुमच्या आभारी आहेत..आणि असतील

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive