By  
on  

“काही तरी नवीन करा…” म्हणणा-या ट्रोलर्सना प्रशांत दामलेंचं चोख प्रत्युत्तर

प्रशांत दामले हे व्यक्तिमत्त्व म्हणजे मराठी रंगभूमीवरचं मोठं नाव. नाटक आणि खवय्येगिरीवर त्यांच विशेष प्रेम आहे. प्रशांत हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतीच प्रशांत यांनी एक पोस्ट शेअर केली. मात्र, या पोस्टवर एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटने प्रशांत यांचे लक्ष वेधले आहे.

एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचे लवकरच ५०० प्रयोग पूर्ण होणार आहेत. त्यासाठी त्यांनी एक पोस्ट त्यांच्या फेसबूकवर शेअर केली आहे. या पोस्टवरून त्यांना एका नेटकऱ्यांने ट्रोल केले आहे. नेटकरी त्यांना ट्रोल करत म्हणाला, काही तरी नवीन करा सर किती वर्ष तेच करणार. नेटकऱ्याच्या कमेंटने प्रशांत यांचे लक्ष वेधले आहे. या नेटकऱ्याला उत्तर देत प्रशांत म्हणाले, नोव्हेंबर २०१८ ला पहिला प्रयोग केलाय.. मधे २० महिने वाया गेले आहेत. तुम्हाला वाटतय ते एका लग्नाची गोष्ट.. हे “एका लग्नाची पुढची गोष्ट” हे नाटक आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive