By  
on  

BBM3 Grand finale : विजेता म्हणून ह्या स्पर्धकाच्या नावाची सोशल मिडीयावर रंगलीय चर्चा

गेले तीन महिने बिग बॉस मराठी ३ या छोट्या पडद्यावरच्या सर्वात लोकप्रिय शोने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. सर्वच स्पर्धकांनी एकापेक्षा एक खेळी करत आपलं स्थान निर्माण केलं. तब्बल 100 दिवसांच्या खडतर अशा प्रवासात टास्क, एलिमिनेशन, कॅप्टन्सी, कुरघोड्या, आरोप आणि वाद-विवादानंतर अखेर बिग बॉस मराठीच्या या सीझनला टॉप 5 स्पर्धक मिळाले. उत्कर्ष, जय , विकास, विशाल आणि मीनल हे स्पर्धक टॉप 5 मध्ये पोहचले आहेत. पण यांच्यातून एकच स्पर्धक विजेतेपदावर आपलं नाव करणार आहे. तेव्हा बिग बॉस मराठी सीझन 3 च्या ग्रॅण्ड फिनालेकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत. प्रत्येकजण आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकविण्यासाठी वोट्सचा वर्षाव करतायत. 

पण सोशल मिडीयावर सध्या एकाच नावाची जबरदस्त चर्चा सुरुय तो म्हणजे विशाल निकम. त्याचा फॅन फॉलोव्हिंग जबरदस्त आहे. विशाल दादाच बिग बॉस मराठी 3 चा विजेता आहे, असं त्यांनी ठरवूनच टाकलंय. बिग बॉस मराठी ३ साठी अनेक पोल्स घेण्यात आले. त्यात विशाल हा आघडीवर आहे. त्यामुळे तोच जिंकावा यासाठी चाहते प्रचंड वोट्स करतायत. 

 

विशालनवर प्रेक्षकांचं विशेष प्रेम असल्याचं  या पोलवरुन दिसतंय.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive