By  
on  

BBM3 Grand finale : उपविजेता जय दुधाणेला घेऊन महेश मांजरेकर करतायत सिनेमा

गेले तीन महिने बिग बॉस मराठी 3 या छोट्या पडद्यावरच्या सर्वात लोकप्रिय शोने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. सर्वच स्पर्धकांनी एकापेक्षा एक खेळी करत आपलं स्थान निर्माण केलं. तब्बल 100 दिवसांच्या खडतर अशा प्रवासात टास्क, एलिमिनेशन, कॅप्टन्सी, कुरघोड्या, आरोप आणि वाद-विवादानंतर अखेर बिग बॉस मराठीच्या या सीझनला टॉप 5 स्पर्धक मिळाले.

उत्कर्ष, जय , विकास, विशाल आणि मीनल हे स्पर्धक टॉप 5 मध्ये पोहचले आहेत. पण यांच्यातून एकच स्पर्धक विजेतेपदावर आपलं नाव कोरणार होता. अखेर ही विजयी ट्रॉफी अभिनेता विशाल निकम याने पटकावली. महाराष्ट्रभरातील चाहत्यांनी त्याच्या बाजूने कौल देत त्याला प्रचंड मतांनी विजयी केलं. तर या स्पर्धेत उपविजेता ठरला हॅण्डसम हंक मॉडेल जय दुधाणे. बिग बॉसच्या घरातच त्याला खरी ओळख मिळाली. जयला ट्रॉफी मिळाली नसली तरी त्याला खुप मोठा बहुमान मिळाला आहे. त्याला थेट महेश मांजरेकरांनी सिनेमात काम करण्याची ऑफर दिलीय. प्रत्येक स्पर्धकाला महेश मांजरेकर हे पहिल्या दिवसापासून पाहत आले आहेत. त्यांच्यातले कलागुण त्यांनी अचूक हेरले आहेत. त्यामुळेच त्यांनी जयला ही ऑफर दिलीय. महेश सरांच्या  शनिवारवाडा या आगामी सिनेमात महत्त्वपूर्ण जय झळकणार आहे. याबाबतची अधिक माहिती महेश मांजरेकर लवकरच जाहीर करतील. 

एक डॅशिंग आणि हॅण्डसम हंक अशी पर्सनॅलिटी असलेला जय दुधाणे ह्या स्पर्धकाचा बिग बॉस मराठीतील 100 दिवसांचा  प्रवास सर्वांनीच पाहिला आहे. त्यामुळे सिनेमात जयला पाहण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive