By  
on  

बिग बॉस मराठी 3 चं विजेतेपद पटकावणा-या अभिनेता विशाल निकमबद्दल तुम्हाला हे माहितीय का?

100 दिवसांच्या खडतर प्रवासानंतर अखेर बिग बॉस मराठी सीझन 3चा विजेता घोषित झाला. अख्या महाराष्ट्राचे डोळे या शोच्या ग्रॅण्ड फिनालेकडे लागले होते. टास्क, एलिमिनेशन, कॅप्टन्सी, कुरघोड्या, आरोप आणि वाद-विवादानंतर अखेर बिग बॉस मराठीच्या या 3 -या सीझनचा विजेता म्हणून विशाल निकम हे नाव जाहीर झालं आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. 

साता जल्माच्या गाठी, दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेमुळे अभिनेता विशाल निकम हे नाव घराघरांत पोहचलं तरी आता बिग बॉस मराठीच्या 3 सीझनचा विजेता म्हणून प्रेक्षकांनी त्याला  भरभरुन प्रेम दिलं. 

बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीपासूनच विशालने आपलं स्थान निर्माण केलं. आपुलकीने आणि लाघवी स्वभावाने त्याने अल्पावधितच घरातल्या सह स्पर्धकांची मनं जिंकली. प्रत्येक टास्क मनापासून खेळणारा आणि आपली टीम जिंकावी म्हणून दोस्तांनासुध्दा मात देणारा विशाल शेवटच्या आठवड्यात Ticket to finale मिळवून विशाल हा बिग बॉसच्या टॉप-5 मधील पहिला स्पर्धक ठरला होता.

सांगलीतील खानापूर येथील एका शेतकरी कुटुंबात विशालचा जन्म झाला. तो 27 वर्षीय आहे. विशालचं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण हे सांगलीतच झालं आहे. भौतिकशास्त्र या विषयातून त्याने एमएस्सीची पदवी घेतली आहे.

व्यायामाची आणि सृदृढ शरीर कमविण्याची आवड असलेल्या विशालला लष्करात जायचं होतं, पण त्याची ओढ मनोरंजनक्षेत्राकडे आहे. असं त्याला जाणवलं. सुरुवातीला मॉडेलिंग करत करत या चंदेरी दुनियेत पाय रोवायचं त्याने ठरवलं. 

 'मिथुन' हा त्याचा पहिलावहिला सिनेमा होता. त्यानंतर तो छोट्या पडद्याकडे वळाला. साता जन्माच्या गाठी ही त्याची पहिली मालिका होती. तसेच तो 'द स्निपर्स' या वेबसीरीजमध्ये देखील मुख्य भूमिकेत होता.

'दख्खनचा राजा ज्योतिबा' या पौराणिक मालिकेतील त्याची ज्योतिबाची भूमिका ही फारच गाजली होती. या मालिकेनंतर विशाल हा थेट बिग बॉसच्या घरातच पाहायला मिळाला.

सुरुवातीला बिग बॉसच्या घरातला  विशाल हा कमकुवत स्पर्धक आहे असं काहींना वाटलं होतं, पण त्याने आपल्या सर्वोत्तम खेळीने महाविजेता होऊन अवघ्या महाराष्ट्राची मनं जिंकली. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive