By  
on  

बिग बॉसचे विजेतपद पटकावल्यानंतर विशाल निकमचा पहिला व्हिडीओ पाहा

100 दिवसांच्या खडतर प्रवासानंतर अभिनेता विशाल निकम याने बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वाचे विजेतपद पटकावलं आहे. तर जय दुधाणे याने उपविजेत्याचा मान पटकावला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाख रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. बिग बॉसचे विजेतपद पटकावल्यानंतर विशालने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

विशालने इन्स्टाग्रामवर नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. यावेळी विशाल म्हणाला, “रामकृष्ण हरी माऊली. मी आता हा व्हिडीओ कशासाठी केला सांगा पाहू, आई शप्पथ सांगतो विशालियन आणि माझ्यावर विशाल प्रेम करणारे तुम्ही लोक नसता तर आज हे मिळालं नसतं.”

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive