By  
on  

'प्रेम आणि फक्त प्रेम...'भावी पतीला ह्रता दुर्गुळेने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरु’ या लोकप्रिय  मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. काही दिवसांपूर्वी हृताने प्रेमाची कबूली दिली होती. त्यानंतर नुकतंच तिने प्रसिध्द हिंदी मालिका दिग्दर्शक प्रतिक शहा याच्यासोबत साखरपुडा केला.

 हृताचा नुकताच शाही थाटात साखरपुडा पार पडला आहे. याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असतानाच ह्रताने प्रतिकच्या वाढदिवसानिमित्त केलेली एक पोस्ट लक्ष वेधून घेतेय. 

ह्रता प्रतिकसाठी पोस्टमध्ये लिहते,"वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मिस्टर शाह..माझ्याकडून तुला खुप खुप प्रेम ..happiness , luck and positivity. तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य  नेहमी असेच राहुदे. तू जिथं जाशील तिथं तुझ्या चेहऱ्यावरचे तेज असेच राहुदे...   प्रेम आणि फक्त तुझ्यासाठी प्रेम ️..असं म्हणत तिनं प्रतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hruta (@hruta12)

प्रतिक आणि ह्र्ताचे अनेक रोमॅण्टिक फोटोसुध्दा साखरपुड्या्च्या निमित्ताने पाहायला मिळतायत. चाहते या सेलिब्रिटी कपलच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive