By  
on  

'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर येणार ' तुमची मुलगी काय करते ' मालिकेतील कलाकार!

     सोनी मराठी वाहिनीवर 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम आता घराघरांत जाऊन पोचला आहे.  इंडियन आयडल हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होतो असून ती भाषा मराठी असल्याने रसिकांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. कार्यक्रमाची निर्मिती आराधना भोला यांच्या फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. या संस्थेने केली आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढते आहे. नुकतेच सर्वोत्तम १२ स्पर्धक महाराष्ट्राला मिळाले असून त्यातून 'इंडियन आयडल मराठी'चा पहिला विजेता/विजेती मिळणार आहे. यंदाच्या आठवड्यात या स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी नवीन सुरू झालेल्या ' तुमची मुलगी काय करते ' या मालिकेतील कलाकार येणार आहेत. अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम, जुई भागवत, अभिनेता हरीश दुधाडे आणि मालिकेची निर्माती मनवा नाईक यांनी आयडलच्या मंचावर स्पर्धकांच्या गाण्याचा आस्वाद घेतला.
 
 मुलांच्या जीवावर बेतल्यावर काहीही करायला तयार असणारी आई आणि तिची रूपं  'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत श्रद्धा मिरजकर हिच्या रुपात पाहायला मिळते आहे.  अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम, अभिनेता हरीश दुधाडे, जुई भागवत आणि निर्माती मनवा नाईक यांनी इंडियन आयडल मराठी च्या मंचावर येऊन स्पर्धकांना आणि आयडल च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. स्पर्धकांची गाणी ऐकून, परीक्षकांना भेटून नवीन मालिकेसाठी उत्तम काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली, असं मत कलाकारांनी व्यक्त केलं. अभिनेत्री जुई भागवत ही रसिकांना इंडियन आयडल मराठीच्या प्रोमो मध्ये दिसली होती. त्यामुळे आयडलच्या संपूर्ण टीमने तिचं कौतुक केलं. 

 

  फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम आणि ' तुमची मुलगी काय करते ' मालिकेच्या कलाकारांना नक्की बघा. 
पाहा, 'इंडियन आयडल मराठी', २७, २८, २९ डिसेंबर, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive