By  
on  

Video : 'बिग बॉस मराठी 3' चा विजेता विशाल निकमची गावी बैलगाडीतून जंगी मिरवणूक

100 दिवसांच्या खडतर प्रवासानंतर अखेर बिग बॉस मराठी सीझन 3चा विजेता घोषित झाला. अख्या महाराष्ट्राचे डोळे या शोच्या ग्रॅण्ड फिनालेकडे लागले होते. टास्क, एलिमिनेशन, कॅप्टन्सी, कुरघोड्या, आरोप आणि वाद-विवादानंतर अखेर बिग बॉस मराठीच्या या 3 -या सीझनचा विजेता म्हणून विशाल निकम हे नाव जाहीर झालं आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. 

विशालने यंदाच्या सिझनमध्ये अनेक टास्कमध्ये उत्तम कामगिरी केली. सोशल मिडीयावर तर सुरुवातीपासुनच विशालचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. विशालला विजेतेपद मिळाल्यावर त्याच्या चाहत्यांनी सोशल मिडीयावर आनंद व्यक्त केलाय.

नुकतीच विशालच्या गावी त्याची जंगी मिरवणूक काढण्यात. बैलगाडीत उभा राहून विशाल आपल्यावर विशाल प्रेम करणा-या गावक-याचे आणि चाहत्यांचे ट्रॉफी हातात घेऊन आभार मानात होता. सर्वांनीच एकच जल्लोष केला. विशाल विजेता झाच्याचा आनंद प्रत्येकामध्ये ओसंडून वाहत होता. 

'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेतून विशालने प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर बिग बॉस मराठीच्या सिझन 3 मध्येही विशालने प्रेक्षकांची मनं जिंकली. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive