“हातात सिगारेट, महिलेचं ओंगळवाणं प्रदर्शन…”, ‘अनुराधा’ चं पोस्टर पाहून

By  
on  

काही दिवसांपूर्वीच बॅन लिपस्टीकचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. यात मराठी अभिनेत्रींनी पुढाकार घेतला होता. नंतर समजलं की हा सर्व प्रकार आगामी वेबसिरीज 'अनुराधा'च्या प्रोमोशनसाठी होता. प्रसिध्द अभिनेत्री तेजस्विनी पंडीत प्रमुख भूमिकेत तर या वेबसिरीजचं दिग्दर्शन संजय जाधव यांनी केलं आहे. या सीरिजवर रुपाली चाकणकर यांनी आक्षेप घेतला आहे.

रुपाली चाकणकर यांची ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पत्र लिहित तक्रार केली आहे. त्या म्हणाल्या, एका वेबसिरीजच्या जाहिरातीसाठी महिलेच्या हातात सिगारेट देऊन तिचं ओंगळवाणं प्रदर्शन करत असल्याचे होर्डिंग्स फोटो समाजमाध्यमांमधून फिरत आहेत आणि याबद्दल बऱ्याच तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. रुपाली यांनी सीरिजच्या दिग्दर्शकाला नोटीस पाठवली आहे. त्यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

Recommended

Loading...
Share