मराठी मालिकाविश्वातील प्रसिध्द कलाकार अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी यांच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच रंगल्या. पण त्यांनी आपलं प्रेम कधीच लपून ठेवलं नाही.
खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो..याप्रमाणेच शिवानी आणि विराजस नेहमीच एकत्र स्पॉट व्हायचे. कधी एकमेकांच्या मालिकांच्या सेटवर जमायचे तर कधी मित्र-मंडळींसोबत एकत्र धम्माल करताना पाहायला मिळायचे. आता नव्या वर्षात या जोडीने आपल्या नात्यावर अधिकृत असं शिक्कामोर्तब केलं आहे.
विराजसने शिवानीच्या बोटात रिंग घातलेला फोटो दोघांनी सोशल मिडीयावर नुकताच शेयर केला आहे. हे गोड कपल ऑफिशियली एन्गेज झाल्याने चाहत्यांनी त्यांच्या या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाटी शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी ही जोडी गोव्यात होती. त्यांनी आपली गोवा ट्रीप खुप एन्जॉय केली. एकमेकांसोबत बराच वेळ घालवला. या फोटोंमधून दोघांची अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळतेय.