सेलिब्रिटींना आजकाल सोशल मिडीयाच्या माध्यमामुळे सतत कुठल्या ना कुठल्या कारणास्तव ट्रोल केलं जातं. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. वहिनीसाहेब या भूमिकेमुळे धनश्री महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली.
धनश्रीसुध्दा सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. मागच्यावर्षी धनश्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
दरम्यान धनश्रीचे वाढलेले वजन पाहून तिला अनेकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. पण धनश्री शांत बसली नाही, तिने अथक परिश्रमाने आपलं वर्कआऊट सुरुच ठेवलं. बाळाच्या जन्मानंतर तिचे वजन फारच वाढले होते. मात्र तिने जबरदस्त मेहनत घेत वजन कमी केले आहे. धनश्री ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र या व्हिडीओमुळे तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे.
यात एकाने ‘मस्त ट्रान्सफॉर्मेशन’ असे म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने ‘लयभारी’, ‘किती बारीक झालात’, अशीही कमेंट केली आहे. तर एकाने ‘काय वाहिनी, कसला डान्स आहे तुमचा सुपर से बहुत बहुत उपर,’ असेही म्हटले आहे. तर ट्रोलर्सनी ट्रोल केले आहे. “तुम्ही आता खूप जाड झाल्या आहात”, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने “तुम्हाला नाही जमलय, हे तुम्हाला शोभत नाही,” अशी कमेंट केली आहे.