By  
on  

संजना फेम प्रसिध्द अभिनेत्री रुपाली भोसलेला करोनाची लागण

राज्यात करोनाचा उद्रेक झाला असून दररोज मोठ्या संख्येने नव्या रुग्णांचे निदान होत आहे. यावेळी करोनाची लागण झपाट्याने होताना दिसतेय. बॉलिवूडला करोनानेआपल्या विळख्यात घेतल्यानंतर आता मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेच्या सेटवरसुध्दा करोनाचा शिरकाव झाला आहे. मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखेंपैकी एक संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले हिला करोनाची लागण झाली आहे. 

अभिनेत्री रुपाली भोसले हिने सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्याला करोना झाल्याचे सांगितले आहे. 

 

रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला एक स्टोरी पोस्ट केली आहे. ‘सर्वप्रकारची काळजी घेऊनही माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी करोना नियमांचे पालन करत असून घरातच स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. मी लवकरच करोनावर मात करेन. कृपया सुरक्षित रहा आणि मास्क लावा. तुमची आणि इतरांचीही काळजी घ्या’ या आशयाची पोस्ट रुपालीने केली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive