म्हणून अभिनेते किरण मानेंची ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून हकालपट्टी; प्रेक्षकांचा संताप

By  
on  

मुलगी झाली हो या मा लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं आहे.एका बाप मुलीच्या नात्याची ही निरागस कहाणी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जातेय.  अल्पावधीच यशाच्या शिखरावर पोहचलेल्या या मालिकेमध्ये किरण माने हे त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असतात.

ग्रामीण भाषेतील लहेजा त्यांच्या सोशल मिडीयावरील लेखणीमधून सहज अनुभवता येतो. अनेकदा ते राजकीय ज्वलंत मुद्द्यांवर व्यक्त होतात. पण याच राजकीय वक्त्व्यामुळे ते बरेच अडचणीत आले आहेत. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 

एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत त्यांनी आपल्याला मालिकेतून टाकल्याच्या वृत्ताला दुजोरासुध्दा दिला आहे. परंतु सोशल मिडीयावर प्रेक्षक आणि नेटकरी घटननेने प्रचंड संतापले असून ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून यावर संताप व्यक्त करत आहेत. 

 

. आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला तरी आपण पुन्हा नव्याने उभारी घेऊ असे संकेत किरण मानेंनी आपल्या पोस्टमधून दिलेत

 

सोशल मीडियावर किरण मानेंविरोधात वाहिनीने केलेल्या कारवाईवरुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अनेक चाहत्यांनी उघडपणे किरण मानेंना या प्रकरणामध्ये पाठिंबा दर्शवलाय. अनेकांनी या कारवाईला संस्कृती दहशतवाद असं म्हटलंय. 

Recommended

Loading...
Share