By  
on  

किरण माने प्रकरणावर समीर विद्वांस यांचं लक्षवेधी ट्विट

'मुलगी झाली हो' या  लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं आहे. एका बाप मुलीच्या नात्याची ही निरागस कहाणी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जाते. परंतु सोशल मिडीयावर आपल्या ज्वलंत लेखणीमुळे प्रसिध्द असलेले किरण माने यांना स्टार प्रवाहवरील या मालिकेतूव कुठलीच पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आलं. 

.“माझ्या राजकीय पोस्ट संदर्भात एका महिलेने तक्रार केली होती त्यावरुन नाराजी दर्शवत मला मालिकेतून काढण्यात आलं”, अशी माहिती अभिनेते किरण माने यांनी दिली आहे. या प्रकरणावर अनेक कलाकार प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान, दिग्दर्शक समीर विद्वंस यांनी  केलेले ट्वीट लक्षवेधी ठरतंय.

समीर विद्वांस ट्विटमध्ये लिहतात, कोणतीही राजकीय भुमिका घेणं/व्यक्त होणं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. घटनादत्त अधिकार आहे. मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे! किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरून त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल तर हे अन्यायकारकच आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive