By  
on  

‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा!’ वादात महेश मांजरेकरांच्या पाठीशी मनसे

महेश मांजरेकरांचा नाय वरणभात लोन्च कोन नाय कोन्च हा सिनेमा बराच वादात सापडला आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच त्यावर सर्व बाजूंनी टिकास्त्र सोडण्यात येतंय. या चित्रपटात असलेल्या बोल्ड दृश्यांमुळे राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. या चित्रपटातील महिला पात्र आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य असून ती काढण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर महेश मांजरेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकले आहेत. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी या वादावर आपलं रोखठोक मत मांडलं आहे. ते म्हणतात,  ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटावरुन जो वाद सुरु आहे, त्यात महेश मांजरेकर यांच्यावर वैयक्तिक स्वरुपाची अश्लाघ्य टीका करणाऱ्यांचा मी अग्रक्रमाने निषेध करतो. महेश मांजरेकर हे मराठी चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाबद्दल जे काही बोलायचं असेल ते चित्रपट बघून ठरवा. पूर्वग्रहदूषित ‘सडकी’ शेरेबाजी करणाऱ्यांनो, आपला मेंदू किती सडलेला आहे हेच तुम्ही जगाला ओरडून सांगताय. मी चित्रपट बघून लवकरच पुन्हा बोलेनच, अशी पोस्ट अमेय यांनी केली आहे. 

अमेय खोपकर यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive