By  
on  

Video : 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी आणि तिची लेक म्हणते, 'बडे अच्छे लगते है....'

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गेले अडीच तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये तिची आई म्हणूनच आता ओळख निर्माण झाली आहे. मधुराणी साकारत असलेली अरुंधती देशमुख ही व्यक्तिरेखा आज अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातली ताईत आहे.

मधुराणी ही एक उत्तम गायिकासुध्दा आहे. ख-या आयुष्यातही व मालिकेतसुध्दा. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी मधुराणी अनेकदा तिच्या गाण्यांचे छोटे व्हिडीओ शेयर करते. चाहतेसुध्दा या व्हिडीओंना भरभरुन दाद देतात. पण नुकतंच मधुराणीने आपली छोटीशी लेक स्वरालीसोबतच्या गाण्याचा एक गोड व्हिडीओ शेयर करत चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive