By  
on  

Video : शेफाली मावशीसोबत परीच्या जबरदस्त Dance मुव्ह्ज् पाहा

‘तुझी माझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. नेहा कामतची लेक परी म्हणून मालिकेत तिची खुप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीसुध्दा तिचे चाहते आहेत. विविध गेटअप्से मधले, ट्रेंडींग गाण्यावर थिरकतानाचे मायराचे व्हिडीओ खुप व्हायरल होतात. 

परी फेम बालकलाकार नेहमीच सेटवरचे विविध व्हिडीओ शेयर करते. अभिनेत्री प्रार्थना बेहरेसोबतचे मायराचे रील  व्हिडीओज खुप व्हायरल होतात. पण नुकतंच परी मालिकेतील तिच्या शेफाली मावशीबरोबर ट्रेंडींग गाण्यावर जबरदस्त थिरकली. 

या गाण्यावर परी फेम बालकलाकार मायरा वायकुळ आणि शेफाली फेम अभिनेत्री काजल काटे जबरदस्त थिरकली आहे. तिचा हा गोड व्हिडीओ पाहून चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केलीय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive