By  
on  

तुमच्या लाडक्या स्विटूने केलेला हा कारनामा पाहिलात का?

कष्टाने आणि मोठ्या जिद्दीने आपण एखादी गोष्ट मिळवतो आणि त्याचं मोल आपल्या लेखी अमूल्य असतं. कारण त्यात आपले श्रम जोडलेले असतात. त्यामुळेच कष्टाने घेतलेली कुठलीही गोष्ट ही खासच असते. त्यातही पहिलं घर, गाडी ह्या तर खुप खास गोष्टी. असाच एक खास क्षण नुकताच स्विटू फेम अभिनेत्री अन्विता फलटणकरने अनुभवला. येऊ कशी तशी मी नांदायला या झी मराठीवरील मालिकेत स्विटू ही नायिका साकारुन अन्विता अवघ्या महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. 

अन्विताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या पहिल्या गाडीचे फोटो शेअर केले आहेत. अन्विताने Hyundai गाडी खरेदी केली आहे. या गाडीचे फोटो शेअर करत अन्विता म्हणाली, “पहिल्या गोष्टी नेहमीच खास असतात.”

अन्विताने खरेदी केलेली ही पहिलीच गाडी आहे व त्याचा तिला खुप अभिमान व आनंद वाटतोय. अन्विताच्या या यशासाठी तिच्यावर सिनेसृष्टीतून व चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive