By  
on  

'आई कुठे काय करते' फेम मधुराणी म्हणते, ' जसे अरुंधती च्या आयुष्यात चढ उतार येतात तसे माझ्याही आयुष्यात चालू असतात...'

आई कुठे काय करते फेम अरुंधती म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री मधुराणी गोखले. सोशल मिडीयावर आजकाल ती  बरीच सक्रीय असते. मालिकेत अरुंधती म्हणजेच आईला तीन मुलं आहेत. त्यांच्याभोवती तिचं अवघं आयुष्य गुंफलेलं पाहायला मिळतंय. पण तरीसुध्दा अरुंधती स्वताची नवी ओळख प्रस्थापित करण्यासाठी धडपडतेय. आपल्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करतेय, यात तिला तिच्या संपूर्ण कुटुंबाची साथ आहे. ऑनस्क्रीन देशमुख कुंटुंब जसं अरुंधती फेम मधुराणीच्या पाठीशी आहे. तसंच एक मोठं मायेनं बांधलेलं कुटुंब मधुराणीच्या ख-या आयुष्यात पाठीशी आहे. त्यांच्यासाठी तिने नुकतीच एक हदयस्पर्शी अशी कृतज्ञता पोस्ट केली आहे. 

मधुराणीला एक दहा-अकरा वर्षांची मुलगी आहे.  जेव्हा ती शूटींगसाटी बराच काळ मुंबईत असते, तेव्हा तिचे पती प्रमोद प्रभुलकर आणि त्यांची ही संपूर्ण सपोर्ट टीम मधुराणीच्या लेकीची व घराची मनापासून काळजी घेतात.

मधुराणी म्हणते, "अरुंधती म्हणून आपण सर्व मला रोज आई कुठे काय करते ह्या दैनंदिन मालिकेत पाहता... पण मधुराणी म्हणून माझ्या व्यक्तिगत आयुष्यातही एक स्वतंत्र डेली सोप चालूच असतो . जसे अरुंधती च्या आयुष्यात चढ उतार येतात तसे माझ्याही आयुष्यात चालू असतात.
गेले २ वर्ष मी ही मालिका करतेय. शूट मुंबईत असतं आणि माझी मुलगी आणि नवरा पुण्यात...! स्वरालीला मी खूपखूप दिवस भेटत नाही , तिच्या आयुष्यातल्या काही छोट्या पण निरागस आनंदात मी नसते. कधी तिच्या छोट्या मोठ्या आजारपणात मी नसते... कधीकधी मी २० /२० दिवस तिला भेटू शकत नाही. काम करताना हे सल आणि मुलीची ओढ आणि आठवण सतत माझ्याबरोबर असते ... पण तिची काळजी अशी नसते कारण प्रमोद त्याचे व्याप सांभाळून अतिशय मायेने सगळं करतो पण ह्यात अतिशय मोलाचा वाटा आहे तो आमच्या support स्टाफ चा.
स्वराली ला शाळेसाठी तयार करणे, नेऊन सोडणे ( तिची शाळा व्यवस्थित ऑफ line सुरू आहे ... त्याबद्दल नंतर लिहीन ) , तिच्या आवडीचं खायला करणे, खायला घालणे , तिच्याशी खेळणे, तिची नाटकं सहन करणे , तिच्या इतर activities साठी पाठवणे.… ही सगळी आणि त्याहीपेक्षा कितीतरी जास्त काम ही सगळी मंडळी अतिशय प्रेमाने आणि निष्ठेने करतात म्हणून मी निर्धास्तपणे काम करू शकते.
आपण भरतकामाची नक्षी पाहतो आणि त्याचं कौतुक करतो पण मागच्या बाजूला वेगळी वीण असते, अनेक टाके आणि गाठीही असतात त्या आधारावर ते नक्षीकाम उभं असतं.
प्रमोद आहे , माझी आईही असते त्याच बरोबर हा इतका प्रेमळ आणि खंबीर स्टाफ आहे म्हणून अरुंधती आहे.
विजय, अमोल , अनिता , ज्योती , अनुराधा , आशा ,
ऋतुजा, अमृता .... तुम्हाला भरभरून प्रेम"

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive