By  
on  

भारतरत्न लता मंगेशकरांसाठी अयोध्येत महामृत्युंजय जप सुरु, मोंदीनाही साधूसंतांनी केलंय आवाहन

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृीत सुधारणा होण्यासाठी अयोध्येत महामृत्यूंजय जप व होमहवन सुरु आहे. 8 जानेवारीपासून लतादीदींवर मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. . ९२ वर्षांच्या लतादीदींना करोनाची लागण झाली आहे.तेव्हापासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

लतादीदींची प्रकृती सुधारावी यासाठी जगभरातील चाहते प्रार्थना करत आहेत. दीदींना बरे वाटावे यासाठी अयोध्येत महामृत्युंजय मंत्राचा जप आणि होमहवन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरात लवकर लतादीदींची भेट घ्यावी अशी इच्छा या होमहवनामध्ये सहभागी झालेल्या जगद्गुरू परमहंस आचार्य महाराजांनी व्यक्त केली आहे.

लतादीदींच्या  प्रकृतीवरुन सोशल मिडीयावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मध्यंतरी या अफवांचं बरच पेव फुटलं होतं. त्यामुळे दीदींच्या अधिकृत हॅण्डलवरुन त्यांच्या आरोग्याची माहिती कुटुंबियांनी देण्यास सुरुवात केली आहे. 

यापूर्वी लतादीदींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की, 'लता दीदींच्या प्रकृतीतत किंचित सुधारणा झाली आहे. मात्र, अद्याप त्यांच्यावर आयसीयूमध्येच उपचार सुरू आहेत. कृपया दीदींच्या प्रकृतीविषयी खोट्या बातम्या पसरवू नका. त्यावर विश्वास ठेवू नका. धन्यवाद.'

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive