By  
on  

महेश बाबू मराठीत बोलतात का?, पत्नी नम्रता शिरोडकर म्हणते...

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू हे महाराष्ट्राचे जावई आहेत, हे सर्वज्ञात. हा सुपरस्टार मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकरच्या पाहताचक्षणी प्रेमात पडला.  महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर हे जोडपे सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. या दोघांविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते.

लग्नानंतर नम्रता ही सिनेसृष्टीपासून बरीच लांब असते. पण सोशल मि़डीयावर एक्टीव्ह असते. त्यामुळे ती नेहमीच कुटुंबाची  काळजी घेत असल्याचं तिच्या पोस्टवरुन दिसतं. काही दिवसांपूर्वी नम्रताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ask me anything द्वारे चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी तिला तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतही महेश बाबू यांच्याबद्दलही अनेकांनी तिला प्रश्न विचारले होते. व तिने त्यांची उत्तरं दिली. 

 

यावेळी एका चाहत्याने नम्रताला प्रश्न विचारला, ‘महेशबाबू मराठीमध्ये बोलू शकतात का?’ त्यावर तिने मजेशीर उत्तर दिले आणि सोबतच तिने तिच्या मनातील इच्छाही बोलून दाखवली. चाहत्याच्या या प्रश्नावार उत्तर देताना ती म्हणाली, ‘माझीसुद्धा फार इच्छा आहे. पण माझ्या दोन्हीही मुलांना मराठी येते. त्यासोबत त्यांना इंग्रजी आणि तेलुगू भाषाही बोलता येते’, असे तिने सांगितले.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive