By  
on  

क्षत्रिय मराठा सेवा संस्थेने पोलिसांत दाखल केली दिग्दर्शक महेश मांजरेकरांविरोधात तक्रार

प्रसिध्द दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर पुन्हा एकदा वादाच्या भोव-याच सापडले आहेत. त्यांच्या नाय वरणभात लोणचं कोण नाय कोणचं ह्या सिनेमामुळे ते मोठ्या संकटात सापडले आहेत. यापूर्वीसुध्दा या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ते अडचणीत सापडले होते. आतासुध्दा गुरुवारी त्यांच्या या सिनेमाविरोधात व महेश मांजरेकरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या सिनेमात महिला व लहान मुलांचे आक्षेर्पाह चित्रण केल्याच्या आरोपावरुन  क्षत्रिय मराठा संस्थेनेे ही तक्रार दाखल केली आहे. 

याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले आहे. क्षत्रिय मराठा सेवा संस्था ने वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात महेश मांजरेकरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी त्यांच्यावर आयपीसी कलम २९२ (अश्लील सामग्रीची विक्री),२९५ (अश्लील कृत्य किंवा शब्दांचा वापर करण्यासाठी शिक्षा), ३४ (सामान्य हेतू) या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. यात महेश मांजरेकर सोबतच त्यांचे सहकारी नरेंद्र, श्रेयस हीरावत आणि एनएच स्टुडीयोवरही हा आरोप करण्यात आला आहे., जे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

 

 

यापूर्वीसुध्दा 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' या चित्रपटाचा जेव्हा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा राष्ट्रीय महिला आयोगाने चित्रपटात बोल्ड आणि आक्षेपार्ह दृष्य काढून टाकण्याची मागणी केली होती. 

 

 

 

 

 

 

 

Source - Maharashtra Times 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive