By  
on  

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी लोककलावंताना दिली आनंदाची बातमी

लावणी आणि तमाशा फड हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारस्याचे अविभाज्य घटक आहेत. पण याच संस्कृतीचे गोले दोन वर्ष जतन करता येत नव्हते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सरकारच्या निर्बंधांमुळे लोककलावंताला आपली कला सादर करता येत नव्हती. निर्बंध लावल्यामुळे अनेक कलावंतांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले होते. आता या लोककलावंतांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून राज्यसरकारने तमाशा सादरीकरणाला परवानगी दिल्याने राज्यभर कलाकारांमध्ये उत्साहाचं  वातावरण पसरलं आहे. 

प्रसिध्द लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरुन ही माहिती दिली. सुरेखाताई पोस्टमध्ये लिहतात, कोरोना महामारी (Coronavirus) आणि त्यामुळे करण्यात आलेलं लॉकडाऊन (Lockdown) तसंच अनेक गोष्टींसाठी निर्बंध घालण्यात आल्याने याचा मोठा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. यामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे तमाशा कलावंतही अडचणीत आले होते. मात्र, आता या कलावंताना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात 1 फेब्रुवारीपासून तमाशा सादरीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. तमाशा कलावंतना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फंडातून 1 कोटींची मदत केल्याबद्दल आणि 1 फेब्रुवारीपासून तमाशा सादरीकरणाला परवानगी दिल्याबद्दल राज्य सरकारचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जाहीर आभार मानले आहेत. आमदार अतुल बेनके यांनी शासन दरबारी कलाकरांचा विषय सतत मांडला त्यांचे खुप खुप आभार

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive