By  
on  

महेश मांजरेकर यांची लेक सई करतेय ह्या प्रसिध्द निर्मात्याचा मुलाला डेट?

मराठीसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा आपल्या अभिनय-दिग्दर्शनाची छाप पाडणारे महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकरने सलमान खानच्या दबंग ३ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात सलमानसोबत तिने  स्क्रीन शेयर तर केलीच पण तिची मुख्य भूमिकाही होती. सई म्युझिक अल्बममध्येसुध्दा झळकलीय. सई सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. सध्या तिच्या रिलेशनशीपविषयी तर्क-वितर्क मांडले जात आहे. 

सई मांजरेकर ही एका प्रसिध्द निर्मात्याच्या मुलाला डेट करतेय अशी चर्चा आहे. बॉलिवूडचे प्रसिध्द निर्माते साजिद नाडियादवाला यांचा  मुलगा सुभान नाडियादवाला याला सई डेट करत असल्याचं बोललं जात असून दोघांनाही अनेकदा कॅफेज् बाहेर किंवा लंच-डिनर डेटसाठी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. तसंच दोघांनीही फोटोग्राफर्सना आपले फोटोज् क्लिक न करण्याची विनंती केलीय. याबाबतचं वृत्त टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिलं आहे. 

सूत्रांनुसार, सई व सुभान अनेकदा स्पॉट होतात. नुकतेच ते दोघं स्पॉट झाले होते. . मात्र त्यांनी एकत्र फोटो क्लिक करण्यास नकार दिला. सुभाननं पॅपराजीला फोटोसाठी पोज दिली आणि नंतर तो त्याच्या कारमध्ये बसून निघून गेला. त्यानंतर सई तिच्या कारमधून निघाली. त्यामुळेच हे फक्त मित्रच आहेत की यांच्यात काही नातं आहे, ह्याचा अद्याप उलगडा झालेला नाही. 

 

 

 

 

 

 

(Source - Times of India) 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive