By  
on  

'त्याचं सगळं श्रेय श्रेयस दादाचंच आहे. निर्वीवाद…', संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट व्हायरल

छोट्या पडद्यावरची माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका अल्पावधितच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांच्या जोडीची कमाल या मालिकेतून प्रेक्षकांवर जादू करतेय.गोड परीची सर्वांनाच भुरळ पडलीय.  पण यांच्यासोबतच श्रेयस व त्याचा मित्र साकारणारा समीर उर्फ अभिनेता संकर्षण कऱ्हाडे ही जोडी पाहून दोस्त असावा तर असा, असंच वाटत राहतं. 

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने श्रेयस तळपदेसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. श्रेयस तळपदेचा नुकताच त्याचा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने त्याने ही पोस्ट लिहिली आहे.

संकर्षण लिहतो, ".. तू खरंच खूप चांगला आहेस.. माझं तुझ्यावर खरंच खूप मनापासून निस्वार्थी प्रेम आहे.. माझ्या मनात तुझ्याविषयी नितांत आदर आहे ..” आणि हे सगळं तू तूझ्या वागण्यातूनच मला वाटायला भाग पाडलं आहेस.. आजवर एक अनुभवी , यशस्वी अभिनेता म्हणुन तू माझ्यावर कधीही , एकदाही , वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्नं केला नाहीस.. तु तुझ्या असण्याचं , वलयाचं माझ्यावर कधिही दडपण आणलं नाहीस.. माझं कौतुकच केलंस आणि मुख्य म्हणजे माझ्या माघारी लोकांनी केलेलं माझं कौतुक मला येउन सांगीतलंस. तुझं मन खरंच खूप मोठं आहे. स्वत:च्या कामाविषयी आत्मविश्वास असलेले लोक ईतरांची निंदा करण्यात वेळ घालवत नाहीत असं म्हणतात.. तसा तू आहेस. तुझ्यासोबतच्या ह्या ७ महिन्यांच्या काळात मी तुला कुणाची निंदा करतांना ऐकलं नाही. म्हणुनच .. माझ्या आयुष्यात आजवर जे जे जेष्ठं किंवा अनुभवी कलाकार आले ज्यांनी मला प्रेमानेच वागवलं आणि माझ्या मनांत आयुष्यभराची आदराची जागा मिळवली त्यांच्या पंक्तीत तू आहेस आणि कायम राहाशील. शिवाय समीर म्हणुन मी काम केल्याने माझ्या लोकप्रियतेत , लोकांच्या माझ्यावरच्या प्रेमात जी भर पडलीये आणि त्यामुळे मला जे जे काही म्हणुन मिळतंय त्याचं सगळं श्रेय श्रेयस दादाचंच आहे. निर्वीवाद.. दादा तुला शुभेच्छा अशा देतो कि , तुला हवं ते सगळं मिळु दे .. तुझ्या इथुन पुढच्या सगळ्या कलाकृतींना घवघवीत यश मिळु दे.. तुझ्या कलाकृतींना भाषेचं बंधन नं राहाता तु सगळ्या जगांत लोकप्रियता मिळव.. एक नवरा म्हणुन सुख , बाप म्हणुन अभिमान , कलाकार म्हणुन यश , आणि माणुस म्हणुन समाधान तुला आयुष्यंभर मिळत राहावं हीच देवाला प्रार्थना.."

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive