By  
on  

आरोग्यमंत्र्यांची माहिती : लता मंगेशकर यांचं व्हेंटिलेंटर हटवलं, प्रकृतीत होतेय सुधारणा

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून त्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतीच दिली आहे. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची करोना चाचणी ८ जानेवारी रोजी पॉझिटिव्ह आली होती. 92 वर्षीय लतादीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु होते. 

मध्यंतरी त्यांची प्रकृती खालवल्याच्या देखील अफवा पसरल्या होत्या. लतादीदींची तब्येत कशी आहे, याबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.

इंडिया टुडेशी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, “लतादीदी सतत डोळे उघडत असून आजूबाजूला बघत आहेत, त्यांची तब्येत आधीपेक्षा बरीच सुधारली आहे. मी लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोललो. त्या बऱ्या होत आहेत. त्या काही काळ व्हेंटिलेटरवर होत्या पण आता नाही. १५ दिवसांच्या उपचारानंतर त्या व्हेंटिलेटरवर नाही. त्यांना फक्त ऑक्सिजन दिला जात आहे. त्या डोळे उघडत आहे, तसेच डॉक्टरांशी देखील बोलत आहे. त्यांना अशक्तपणा असून संसर्ग देखील आहे. पण त्या डॉक्टरांच्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असून त्या आता बऱ्या आहेत.”

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive