By  
on  

बिग बॉस मराठी फेम सोनाली पाटील म्हणते, '...आणि अखेर अडीच वर्षांनी मी तिला भेटले, खुप बोलले'

बिग बॉस मराठी ३ फेम अभिनेत्री सोनाली पाटील ही मूळची कोल्हापूरची. तिला कोल्हापूरबद्दल मोठा अभिमान आहे. कोल्हापूर म्हटलं की कोल्हापूरची अंबाबाई डोळ्यासमोर येते. ह्या करवीरनिवासीनीचं दर्शन घेणं आणि आपली मोनकामना पूर्ण करणं हा भक्तांचा अग्रकम. सोनालीनेसुध्दा दोन वर्षांनी अंबाबाईचं दर्शन घेत तिच्यावरील अपार श्रध्देपोटी  खास पोस्ट लिहली. 

सोनाली लिहते, "आणि अखेर अडीच वर्षांनी मी तिला भेटले....... खुप बोलले गर्दी असो किंवा नसो तिने माझी साथ कधीच सोडली नाही...... मीच थोडी रागावलेले तिच्यावर पप्पांसाठी पण तिने मला तिच्या कृतीतून पुन्हा दाखवून दिलं तु रुसलीस तरी मी नाही रागावलेले तुझ्यावर........ आणि सांगू मी जर तिच्यावर प्रेम करू शकते तर रागावू पण शकते ना ? म्हणुन भरून आलं आणि स्वतःला रडण्यापासून नाही रोखू शकले अजून जवळ येवून घट्ट मिठी मारायची होती तुला पण पण तुम्हा सगळ्यांचं अख्ख्या महाराष्ट्राचं, माझ्या कोल्हापूर चं इतकं प्रेम मिळतंय कौतुक होतंय तेव्हा तिच्या प्रेमाची ऊब प्रकर्षाने जाणवते ......... अजून काय हवंय वचन देते तुझी ही साथ कधी सोडणार नाही कारण तुलाही माहितेय तुझ्याशिवाय मी काहीच नाही...... लै लव यू आई "

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive