By  
on  

अभिनेत्री सायली संजीवचं बर्थडे सेलिब्रेशन, बाबांच्या आठवणीत झाली भावूक

 सायली संजीव हिने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मराठी सिनेविश्वातील गोड अभिनेत्री अशी तिची ओळख आहे.. या पहिल्याच मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राचं मन तिने जिंकलं. आता अनेक मराठी सिनेमांमधून भेटीला येणारी सायली छोट्या पडद्यावर शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत सायली साकारत असलेल्या शर्वरी या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. तसंच अलिकडेच प्रदर्शित झालेल्या झिम्मा या सुपरहिट मालिकेतही ती झळकली होती. 

नुकतंच 31 जानेवारी रोजी सायली संजीव हिचा वाढदिवस होता. पण डिसेंबरमध्ये तिच्या वडीलांचं निधन झाल्याने बाबांच्या आठवणीत सायली वाढदिवशी खुपच भावूक झाली. तिने घरीच साधेपणाने तिचा वाढदिवस साजरा केला. 

 

 

सायलीने घरच्या घरी साधेपणाने सेलिब्रेशन केलेल्या वाढदिवसाचे फोटो शेयर केले आहेत. बाबांच्या फोटोसोबत तिने केक कट केला. सायलीच्या ह्या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive