By  
on  

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय सुरांची मैफील, 'मी वसंतराव' लवकरच

जिओ स्टुडिओजचा पहिला मराठी सिनेमा 'मी वसंतराव'  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 1 एप्रिल 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.  ज्येष्ठ शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारीत आहे. तर या सिनेमाचे दिग्दर्शन निपूण धर्माधिकारी याने केले आहे. तर यात वसंतरावांची मुख्य भूमिका त्यांचा नातू आणि प्रसिध्द शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी साकारली आहे. अनेक नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवासाठी  'मी वसंतराव'  या सिनेमाची निवड झाली आहे.  

या सिनेमात अनिता दाते, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वाळोकर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.    प्रसिद्ध तबला वादक उस्ताद जाकिर हुसैन यांच्या हस्ते या सिनेमाच्या  टीझर आणि पोस्टरचे अनावरण करण्यात आले होते. 

 

टीझरमध्ये वसंतरावांचे विचार, संगीतावरचं प्रेम आणि प्रत्येकवेळी घेतलेली खंबीर भूमिका यावर प्रकाश टाकण्यात आला होता. तेव्हापासून या सिनेमाविषयीची उत्सुकता वाढली आहे. 

गोव्यात होणाऱ्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2021 मध्ये 'मी वसंतराव' या सिनेमाची निवड झाली. तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर गजलेल्या 'कान्स' चित्रपट महोत्सवातही सिनेमाची निवड झाली होती.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive