By  
on  

त्या दिवशी खरंच माणसातल्या "देवाला" भेटल्याचा अनुभव आम्ही घेतला . . .

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रमेश देव यांचं निधन झालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने रमेश देव यांची प्राणज्योत मालवली. त्यांना धिरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रमेश देव यांच्या निधनाने संपू्र्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचा दिग्दर्शक आणि निवेदक निलेश साबळे याने ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या आठवणींना  सोशल मिडीयाच्या माध्यमातून उजाळा दिला आहे. त्यांच्यासोबतचा फोटो शेयर करत निलेश म्हणतो, "मोठा माणूस !" या वयातही आम्हाला लाजवेल हा उत्साह आणि शेवट पर्यंत कलाकार म्हणून काम करण्याची इच्छा ! हे आम्ही आत्ताच २७ जानेवारीला अनुभवलं . . सरांनी "हे तर काहीच नाय" मध्ये येवून आम्हाला आर्शीवाद दिला . . . . सगळंच स्वप्नवत ! त्यांच्या आयुष्यातले मंतरलेले किस्से त्यांनी सांगून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं . . . तोंडभरून कौतुक केलं . . . . त्या दिवशी खरंच माणसातल्या "देवाला" भेटल्याचा अनुभव आम्ही घेतला . . . . पुढच्याच आठवड्यात चला हवा येवू द्या मध्ये संपूर्ण कुंटुंबासह ते येणार होते . . . . आत्ता बातमी ऐकून खरंच काही सुचत नाही अशी आमची सर्वांचीच अवस्था झाली आहे . . . . पण २७ तारखेचा तो संपूर्ण दिवस तुमच्या जवळ आम्हाला वावरता आलं , कलाकारातला माणूस कसा असावा आणि किती मोठा असावा याचा अनुभव आम्हाला आला . . . . देव साहेब आपण खरंच ग्रेट आहात , आणि नेहमी रहाल . . . . !

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive