By  
on  

Exclusive Video : 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' 2021 सोहळ्यातील अभिनेते रमेश देव यांची Exclusive झलक

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रमेश देव यांचं निधन झालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने रमेश देव यांची प्राणज्योत मालवली. त्यांना धिरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रमेश देव यांच्या निधनाने संपू्र्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठीसोबतच हिंदीतही त्यांनी आपल्या अभिनयाने स्थान निर्माण केले होते. सदाबहार अभिनेते म्हणून ते ओळखले जायचे. 

रमेश देव यांच्यावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची बातमी देव कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी दिली.

रमेश देव यांची एक एक्सक्ल्युझिव्ह झलक पिपींगमून मराठीच्या कॅमे-यात कैद झाली होती. शेवटपर्यंत सिनेमावर प्रेम करणारा हा  सच्चा कलाकार  90  दी ओलांडली सिनेसृष्टीतील प्रत्येक सोहळ्याला हजेरी लावायचा. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive