By  
on  

रमेश देव यांच्या निधनानंतर सोनाली कुलकर्णीची भावूक पोस्ट

मराठी सिनेसृष्टीतील सदाबहार दिग्गज अभिनेते रमेश देव अनंतात विलीन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चाहत्यांसोबतच कलाकारसुध्दा रमेशजींच्या आठवणींना उजाळा देत आहे. मराठीतील ाघाडीची ्बिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला ती 20 वर्षाची असताना रमेश देव यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती. या आठवणींना तिने उजाळा  दिला आहे. 

 

सोनाली कुलकर्णी पोस्टमध्ये म्हणते,  “रमेश देव ….त्यांनी दिग्दर्शत केलेल्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली म्हणून त्यांना अगदी जवळून पाहता आलं..अगदीच २० एक वर्षांची मी. रमेश काका, सर…काय म्हणावं कळत नव्हतं, त्यांचं stardom, aura, अनुभव, दरारा… पाहून intimidate झाले होते…पण अगदी वडिलांसारखं सांभाळत त्यांनी माझ्याकडून काम करून घेतलं. त्यांचा उत्साह, काम करण्याची जिद्द, इतकी वर्षं इतकी कमालीची कामं करूनही ज़रा ही कमी झालेला नव्हता. In fact, set वर त्यांची energy कधी ही कुणी ही match करू शकायचा नाही. एखादा चांगला shot बघून अगदी लहान मुलांसारखे excited व्हायचे

अगदी इतक्यातंच.. #mfk पुरस्कार सोहळ्यात त्यांना भेटले होते… तेव्हाही तेतकेच उत्साही वाटले…आज ते आपल्यात नाही… अविश्वसनीय ! भावपूर्ण श्रद्धांजली”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive