By  
on  

Photos : 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्रीची अंडरवॉटर फॅशन फोटोग्राफी

कलाकार त्यांची कला ही वेगवेगळ्या माध्यमांतून दाखवत असतात, नवनवे प्रयोग करत असतात, कधी अभिनयात तर कधी त्यांच्या कामाच्या बाबतीत. असाच एक भन्नाट प्रयोग आणि कम्मालss ऍक्टिव्हिटी अभिनेत्री रीना मधुकरने केली आहे आणि ती म्हणजे रीनाने नुकतेच अंडरवॉटर फोटोशूट केले आहे. रीनाने पाण्याखाली जाऊन जे फोटोशूट केले त्याचे विशेष कौतुक तिच्या चाहत्यांकडून, सिनेसृष्टीतील कलाकारांकडून होतंय. रीनाच्या या WOW फोटोशूटमुळे ब-याच जणांनी तिची ‘मराठी सिनेसृष्टीतील जलपरी’ म्हणून देखील प्रशंसा केली.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी अंडरवॉटर फोटोशूट केले आहे, पण मराठीत अंडरवॉटर फॅशन फोटोग्राफी करणारी रीना ही पहिली मराठी अभिनेत्री आहे. पाण्याच्या खाली जाऊन फोटोसाठी पोज् देणे, चेह-यावरील हावभाव अगदी अचूक दाखवणे ही खरोखर एक कला आहे आणि रीनाने या सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट केल्या आहेत. या प्रकारच्या फोटोशूटमध्ये कपडे, मेकअप याला पण विशेष महत्त्व असते. रीनाची स्टायलिस्ट निकेता बांदेकर, मेकअप आर्टिस्ट निखिल पवार यांनी पण पाण्याखाली कोणत्या प्रकारचं फॅब्रिक जास्त रेखीव दिसेल, पाण्यातही ग्लो दिसेल असा मेकअप आदी गोष्टींचा विचार करुन त्यांनी त्यांची कलाकारी दाखवली. हे सर्वकाही जुळून आलं की खरी कसरत सुरु होते ती फोटोग्राफरची. कॅमेराचे सेट पाण्याखाली घेऊन जाणे, जसा हवा अगदी तसाच शॉट मिळवणे ही सगळी कला फोटोग्राफरची.

या कमाल फोटोशूटचा कमाल अनुभव रीना सांगतेय, “पाण्याच्या खाली जाऊन एक्सप्रेशन देणं, डोळे उघडे ठेवून कॅमेरा फेस करणं हे खूप ट्रिकी होतं. मला आणि फोटोग्राफर सुमीत, आम्हा दोघांनाही अशा प्रकारच्या फोटोशूटचा अनुभव नसल्यामुळे कसं होईल, काय होईल याची भिती होती पण काही तरी ऍडवेंचर करतोय म्हणून उत्साह जास्त होता. मुळात, थंडी इतकी होती की काय सांगू. पण माझी टीम निकेता, निखिल, सुमीत, नवीन, दिपेश, हर्षल हे सर्वजण फार सपोर्टिंग होते, त्यांनी मला संपूर्ण फोटोशूटच्या दरम्यान चिअर अप केलं. हे फोटोशूट एक टीम वर्क होतं.”

फोटोग्राफर सुमीत गुरवने त्याचा अनुभव सांगताना म्हटले की, “हा खूप वेगळा आणि छान अनुभव होता. शूट जेवढं इंटरेस्टिंग होतं तितकंच ते चॅलेंजिंग ही होतं. याआधी कधी असं अंडरवॉटर फोटोशूट मी केलं नव्हतं. त्यामुळे खरंतर हे शूट करताना आधी थोडं टेन्शन होतं तितकीच एक्साईटमेंट देखील होती.  शूट करताना पाण्याखाली जाऊन परफेक्ट टाईम वर क्लिक करणं तेवढा वेळ बॉडी पाण्याखाली स्टेबल ठेवणं हे खूप कठीण आहे. पण आम्ही ते उत्साहाने, आनंदाने आणि समाधानाने पूर्ण केलं.”

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive