By  
on  

पु.ल. एकदा भाषणात म्हणाले होते की या आकाशात सूर्य आहे.. चंद्र आहे.. आणि लता चा स्वर आहे..!!

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून  उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे.त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणं आढळून आल्याने व निमोनिया झाल्यामुळे  आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. अवघा देश दीदींच्या जाण्याने शोकसागरात बुडाला आहे. 

सर्वच स्तरातून दीदींना श्रध्दांजली वाहण्यात येत आहे. मराठीतील प्रसिध्द कलाकार भरत जाधव, महेश मांजरेकर, अंकुश चौधरी यांची एका नाटकाच्यानिमित्ताने दीदींसोबत ग्रेट-भेट झाली होती. त्या आठवणींना भरत जाधव यांनी सोशल मिडीयावर उजाळा देत श्रध्दांजली अर्पण केली  आहे. 

 

भरत जाधव यांनी शेयर केलेला हा फोटो व त्याचं कॅप्शन खुपच सुंदर आहे. त्यांनी पु.ल. देशपांडे यांच्या एका भाषणाचा दाखला देत म्हटलं आहे. भरत जाधव म्हणतात,  पु.ल. एकदा आपल्या एका भाषणात म्हणाले होते की या आकाशात सूर्य आहे.. चंद्र आहे.. आणि लता चा स्वर आहे..!!दीदी तुम्ही.. तुमचा आवाज..आणि तुमच्या स्मृती अमर आहेत..!
शतशः नमन !

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive