By  
on  

समीर चौघुले लतादीदींच्या आठवणीत भावूक, त्यांनी “आपण भेटू असं आमंत्रण दिलं होतं आणि आज…,”

आज भारतरत्न लता मंगेशकर आपल्यातून निघून गेल्या. पण त्यांनी गायलेल्या सुरेल गाण्याच्या रूपाने लतादिदी कायम आपल्यात राहतील. त्यांच्या निधनाने कायमची एक पोकळी आज निर्माण झाली आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून  उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे.त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणं आढळून आल्याने व निमोनिया झाल्यामुळे  आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. अवघा देश दीदींच्या जाण्याने शोकसागरात बुडाला आहे. 

भिनेता समीर चौघुलेने देखील लतादीदींना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.

समीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लतादींदीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत “निशब्द लतादीदी, अगदी काही दिवसांपूर्वी आपण मला फोन केला होतात आणि हे करोनाच संकट दूर झालं की आपण नक्की माझ्या घरी या आपण भेटू असं आमंत्रण दिलं होतं आणि आज? आसमंतातले लक्ष लक्ष सुर क्षणार्धात पोरके झाले. स्वरांची सरस्वती आम्हा भक्तांना पोरकी करून गेली. अख्या जगाला जगण्याची उमेद देणाऱ्या आवाजाला काही घटका आमच्या हास्यजत्रेने हसवलय हे आम्हा सर्वांचं भाग्य दीदी भावपूर्ण श्रद्धांजली”, असे कॅप्शन दिली आहे. लतादीदींनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कॉमेडी शो पाहिल्यानंतर समीर चौगुलेला फोन केला होता.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive