By  
on  

आशा भोसलेंनी लतादीदींसोबतचा बालपणीचा फोटो केला शेयर, चाहतेही झाले भावूक

भारतरत्न लता मंगेशकर आपल्यातून निघून गेल्या. लता दीदी अनंतात विलीन झाल्या आहेत.  पण त्यांनी गायलेल्या सुरेल गाण्याच्या रूपाने लतादिदी कायम आपल्यात राहतील. त्यांच्या निधनाने कायमची एक पोकळी आज निर्माण झाली आहे. लता दीदींना शासकीय इतामामात मानवंदना देण्यात आली. अंत्यसंस्कारही करण्यात आले. 

मोठ्या जड अंत:करणाने दीदींना चाहत्यांनी अखेरचा निरोप दिला. त्यांचा सुरेल स्वर अजरामर राहील, हे मात्र नक्की. 

आशा भोसले यांनी इन्स्टाग्रामवर लता मंगेशकर यांच्या आठवणीत एक फोटो शेअर केला आहे. आशा भोसले यांनी बालपणीचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. आशा आणि लता या दोन्ही बहिणींनी कलाविश्वाला भरभरुन दिलं आहे. त्यांच्या सुरेल स्वरांची जादू कायम चाहत्यांवर मोहिनी घालत राहिल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Asha Bhosle (@asha.bhosle)

 

हा फोटो शेअर करत त्यांनी त्याला भावनिक कॅप्शनही दिले आहे. ‘बालपणीचे दिवस काय होते बहिण आणि मी’, असे कॅप्शन देत त्यांनी हार्ट इमोजी शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोवर अभिनेता सिद्धांत कपूरने कमेंट केली आहे. ‘लव्ह यू, आजी’, असे त्याने यात म्हटले आहे. दरम्यान आशा भोसले यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive