By  
on  

बाबांच्या आठवणीत सायली संजीवने गोंदवला टॅटू

सायली संजीव हिने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मराठी सिनेविश्वातील गोड अभिनेत्री अशी तिची ओळख आहे.. या पहिल्याच मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राचं मन तिने जिंकलं. आता अनेक मराठी सिनेमांमधून भेटीला येणारी सायली छोट्या पडद्यावर शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत सायली साकारत असलेल्या शर्वरी या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. तसंच अलिकडेच प्रदर्शित झालेल्या झिम्मा या सुपरहिट मालिकेतही ती झळकली होती. 

गोड आणि लाघवी सायलीला डिसेंबरमध्ये पितृशोक झाला. ती बाबांच्या खुप जवळ होती, बाबांच्या आठवणीत तिने एक भावूक करणारी कविताही पोस्ट केली होती.  31 जानेवारी रोजी सायली संजीव हिचा वाढदिवस होता. पण डिसेंबरमध्ये तिच्या वडीलांचं निधन झाल्याने बाबांच्या आठवणीत सायली वाढदिवशी खुपच भावूक झाली. आता नुकतंच सायलीने बाबांच्या आठवणीत एक सुंदर टॅटू गोंदवून घेतला आहे. त्याचा फोटो तिने पोस्ट केला आहे. 

चाहत्यांनीसुध्दा सायलीच्या या टॅटूच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive