By  
on  

Photos : चॉकलेटी रंगाच्या साडीत सई ताम्हणकरचा मनमोहक अंदाज

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस लुक कॅरी करण्यात ही फॅशनिस्टा नेहमीच पुढे असते. पण जितकं वेस्टर्न आऊटफिटमध्ये सई सुंदर दिसते त्याहूनही खुप जास्त सही ती साडीत दिसते. म्हणूनच साडीतले काही मनमोहक फोटो सईने नुकतेच चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

सईने चॉकलेटी रंगाच्या साडीतले मनमोहक फोटो नुकतेच चाहत्यांशी शेयर केले आहेत. 

चॉकलेटी रंगाच्या या नूवारी साडीत सईचा सुंदर व बोल्ड अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय. 

चाहत्यांनी सईच्या फोटोंवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाची सई परिक्षक आहे. या कार्यक्रमाच्या एका भागासाठी सईने हा साडी लुक केला होता. 

सईच्या साडी लुकमधील फोटोंना नेहमीच पसंती मिळताना दिसते. 

सई आगामी मराठी सिनेमा कलरफुल, मिडीयम स्पायसीमध्ये झळकणार आहेत. तर बॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या लॉकडाऊन इंडिया बॉलिवूडपटातही ती महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive