By  
on  

लतादीदींच्या निधनानंतर गायिका वैशाली सामंत यांनी केली ही कळकळीची विनंती

भारतरत्न लता मंगेशकर आपल्यातून निघून गेल्या. लता दीदी अनंतात विलीन झाल्या आहेत.  पण त्यांनी गायलेल्या सुरेल गाण्याच्या रूपाने लतादिदी कायम आपल्यात राहतील. त्यांच्या निधनाने कायमची एक पोकळी आज निर्माण झाली आहे. लता दीदींना शासकीय इतामामात मानवंदना देण्यात आली. अंत्यसंस्कारही करण्यात आले.  मोठ्या जड अंत:करणाने दीदींना चाहत्यांनी अखेरचा निरोप दिला. त्यांचा सुरेल स्वर अजरामर राहील, हे मात्र नक्की.

 लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून  उपचार सुरु होते. .त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणं आढळून आल्याने व निमोनिया झाल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

दीदींच्या निधनानंतर सोशल मिडीयावर त्यांच्या  अखेरच्या दिवसांतले काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यांचे असे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होणं ही एक निराशाजनक व संतापजनक बाब आहे. म्हणून मराठी सिनेसृष्टीतील गायिका वैशाली सामंत हिने चाहत्यांना कळकळीची विनंती केली आहे.

सुनील गाडगीळ या दादर येथील नागरिकाने केलेली विनंती वैशाली सामंत यांनी पोस्ट केली आहे. ते म्हणतात, स्वर्गीय लतादीदींच्या दु:खद निधनानंतर समाजमाध्यमांवर त्यांच्या अखेरच्या दिवसातले व विकलांग अवस्थेतले काही व्हिडीओ पाठवले जात आहेत जे पाहणे आपल्यातल्या प्रत्येकाच्या मनासाठी क्लेशकारक आहे ... कलाकाराला त्याच्या कलेची साधना करत असताना किंवा कलेचा आविष्कार प्रगट करत असताना जरूर पहावे ... ऐकावे ... पण शारीरिक व्याधीनी जर्जर आणि विकलांग झालेले पाहणे खरच मनाला यातना देऊन जाते ... आपण सर्वानी ही काळजी आवर्जून घ्यायला हवी की अशा चित्रफिती जर आपल्याला कोणीही पाठवल्या तर त्याना कृपया समजावून सांगावे व परावृत्त करावे ... तसेच आपणदेखील हे पुढे न पाठवण्याची खबरदारी घ्यायलाच हवी ... तरच स्वर्गीय लतादिदीना आपण श्रद्धांजली वाहण्यास पात्र असू ....

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive