By  
on  

पाहा Trailer : सोनाली कुलकर्णीचा 'बेस्टसेलर' डिजीटल डेब्यू, मिथुन चक्रवर्तींसोबत करणार स्क्रीन शेयर

मराठी पाऊल पडते पुढे असंच आता मोठ्या अभिमानाने म्हणावं लागेल.अनेक मराठमोळ्या कलाकारांच्या पावलावर पाऊल ठेवत सोनाली कुलकर्णीसुध्दा हिंदीत झळकतेय.  महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपला डिजीटल डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. तोसुध्दा बॉलिवूडमध्ये. बेस्टसेलर या आगामी वेबसिरीजमध्ये सोनाली कुलकर्णी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतेय. विशेष म्हणजे यात ती बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत स्क्रीन शेयर करतेय. 

सई ताम्हणकर, प्रिया बापट, संतोष जुवेकर, अमृता खानविलकर, अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी, सिध्दार्थ चांदेकर, आदिनाथ कोठारे अशा हिंदीत चमकणा-या मराठी कलाकारांच्या यादीत सोनाली कुलकर्णीच्या नावाचाही समावेश होत आहे. 

बेस्टसेलर ही हिंदी वेबसिरीज एमेझॉन प्राईम व्हिडीओची प्रस्तुती आहे. या सस्पेन्स-थ्रीलर वेबसिरीजमध्ये मिथुन चक्रवर्ती, श्रृती हसन, अर्जुन बाजवा, गौहर खानआणि सोनाली कुलकर्णी अशा टॅलेंटेड कालाकारांची फौज आहे. हा सायकॉलॉजिकल सस्पेन्स-थ्रीलर ड्रामा आहे. सिध्दार्थ मल्होत्राच्या अल्केमी प्रोडक्शन द्वारा निर्मित आणि मुकुल अभ्यंकर द्वारा दिग्दर्शित बेस्टसेलर ही वेबसिरीज येत्या 18 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 

 

सोनाली कुलकर्णीचा हा बेस्टसेलर ट्रेलर पाहून चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे,.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive