By  
on  

मी बऱ्याच दिवसांपासून रोमॅण्टिक भूमिकेची वाट पहात होतो : शशांक केतकर

‘होणार सून मी या घरची…’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घरा- घरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर नायक ते खलनायक अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आला आणि त्याचं कौतुकही झालं. लवकरच शशांक  स्टारप्रवाहवरील मुरांबा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, त्यानिमित्ताने त्याने सांगितलेल्या खास गोष्टी

 

मुरांबा मालिकेविषयी काय सांगशिल?

मुरांबा या शीर्षकाप्रमाणेच एक छान आंबट-गोड लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कौटुंबिक गोष्ट आहे. नात्यांमधले ऋणानुंबध त्यातला गुंता यावर भाष्य करणारी गोष्ट आहे. जवळपास दीड वर्षांनंतर लव्हस्टोरी घेऊन भेटीला येतोय. स्टार प्रवाह वाहिनीचे मनापासून आभार त्यांनी प्रवाह दुपारच्या माध्यमातून आता दुपारीही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा प्रवाह सुरु केला आहे. १४ फेब्रुवारीला मालिका सुरु होतेय त्यामुळे जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना प्रेमात पडायचं आहे त्यांच्यासाठी मुरांबा ही मालिका छान गिफ्ट असेल.

मालिकेतल्या तुझ्या लुकविषयी काय सांगशिल?

मी आणि माझी बायको प्रियांका नुकतेच आई-बाबा झालो. आई-बाबा झालो असलो तरी पूर्वीसारखंच फिट रहायचं आहे. वेटलॉस नाही मात्र फॅटलॉस केला आहे. त्यामुळे नव्या रुपात आणि नव्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटणार आहे.

 

रोमॅण्टिक भूमिकेत पुन्हा दिसणार आहेस त्याविषयी...

मी बऱ्याच दिवसांपासून रोमॅण्टिक भूमिकेची वाट पहात होतो. भुमिकेच्या बाबतीत तुम्ही कितीही वेगळा प्रयोग करायला गेलात तरी लव्हस्टोरीची गोष्टच वेगळी आहे. प्रेक्षकांना लव्हस्टोरी आपलीशी वाटते. मालिकेच्या नावाप्रमाणेच एक आंबट-गोड लव्हस्टोरी आहे. मुरांबा ज्याप्रमाणे मुरला की त्याची चव वाढते अगदी त्याचप्रमाणे मालिकेत नाती मुरताना तुम्ही अनुभवाल. स्टार प्रवाहवसोबत जवळपास ८ वर्षांनंतर काम करतोय. स्टार प्रवाह नंबर वन वाहिनी आहे. त्यामुळे या वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना खूप मजा येतेय.

 

मुरांबा मालिकेतील तुझ्या व्यक्तिरेखेचं वेगळेपण काय आहे?

अक्षय मुकादम असं व्यक्तिरेखेचं नाव आहे. आईवर जीवापाड प्रेम करणारा आणि आजीच्या धाकाखाली वाढलेला असा हा अक्षय. अक्षयला नाती जपायला आवडतात. शशांक आणि अक्षय या दोघांमधलं साम्य असं ती म्हणजे खवय्येगिरी. स्वयंपाक घरात नवनवे प्रयोग करायला मला आवडतात. मालिकेत देखिल माझं स्वयंपाक घराशी जवळचं नातं असणार आहे. 

मुरांबाची वेळ दुपारची आहे त्याविषयी...

स्टार प्रवाहच्या सर्वच मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमापोटी स्टार प्रवाह वाहिनीने प्रवाह दुपार हा नवा स्लॉट सुरु केला आहे. लग्नाची बेडी आणि मुरांबा या दोन मालिका दुपारच्या वेळेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मुरांबाची वेळ दुपारी १.३० वाजताची आहे. सहकुटुंब जेवणाचा आनंद घेत प्रेक्षकांना ही मालिका पहाता येईल. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका मुरांबा दुपारी १.३० वाजता फक्त स्टार प्रवाहव

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive